जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुपर मॉमने रचला विक्रम


उलान-उदे (रशिया) – गुरुवारी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात कोलंबियाच्या एंग्रीट वेलेन्सियाचा मेरी कोमने ५-० असा सरळ पराभव केला. मेरी कोमने या विजयासह भारतासाठी एक पदक निश्चित केले.


मेरी कोमचे जागतिक अजिंक्यद स्पर्धेतील आठवे पदक या कामगिरीसह निश्चित झाले आहे. आता ती कोणते पदक जिंकेल हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे. दरम्यान, मेरी कोमच्या नावे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक पदक जिंकण्याचा विक्रम आहे. तिने या स्पर्धेत यापूर्वी ६ सुवर्ण आणि एक रौप्यपदक पदक जिंकले आहे. मेरी कोम ४८ किलो वजनी गटातून तब्बल सहा वेळा विश्वविजेती ठरली आहे. यंदा मात्र, ती पहिल्यादांच ५१ किलो वजनी गटातून स्पर्धेत उतरली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ५१ किलो वजनी गटातून तिचे हे पहिलेच पदक ठरणार आहे.

Leave a Comment