सौदीने महिलांना दिली सैन्यात काम करण्याची परवानगी

जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आणि रूढीवादी राष्ट्र असलेल्या सौदी अरेबियामध्ये दिवसेंदिवस महिलांसाठी असलेल्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात येत आहेत. व्हिजन 2030 लक्ष्य समोर ठेऊन सौदी सरकार आर्थिक आणि सामाजिक सुधारणा करत आहेत. आता सौदी सरकारने महिलांना देखील सशस्त्र दलात सेवा करण्याची परवानगी दिली आहे.

सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांना अटक करत असल्याचा आरोप मानवाधिकार समुहाने सौदीवर केला होता. याच पार्श्वभुमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. महिलांच्या अधिकांरामध्ये वाढ करण्याचा उद्देश समोर ठेऊन महिलांना सैन्यात संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला सशक्तीकरणासाठी सौदी अरेबियाने आतापर्यंत पाच महत्त्वपुर्ण निर्णय घेतले आहेत.

(Source)

2017 मध्ये प्रिंस सलमान सत्ते आल्यानंतर त्यांनी व्हिजन 2030 समोर ठेवले. त्यांनतर महिलांवर लादण्यात आलेल्या अटी हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. 2018 मध्ये पहिल्यांदा सौदीत महिलांना वाहन चालवण्याची परवानगी दिली होती.

(Source)

महिलांना वाहन चालवण्याचा अधिकार दिल्यानंतर महिलांना हवाई जहाजांचे पायलट म्हणून काम करण्याची परवानगी देण्यात आली. 2018 मध्ये सौदी अरेबियाच्या एअरलाइन्सने सह-पायलट आणि फ्लाइट अटेंड्साठी महिलांची भरती करण्याची घोषणा केली होती. 21 तासांच्या आत या पदासाठी 1 हजार महिलांनी अर्ज केले होते.

(Source)

महिलांच्या अधिकारात वाढ करत महिलांना परदेशात एकटा प्रवास करण्याची परवानगी सौदीने दिली. 21 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना पासपोर्ट मिळवण्याची आणि परदेशात एकटा प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.

(Source)

सौदीने चौथे पाऊल उचलले की, सौदीच्या महिला बाळांचा जन्म, लग्न आणि घटस्फोटाचे अधिकृतरित्या नोंदणी करू शकतात. त्यांना पुरूषांप्रमाणेच नाबालिक मुलांच्या संरक्षक म्हणून मान्यता देण्यात आली.

आता सौदी शासनाने महिलांना सैन्यात सेवा करण्याची परवानगी देत आणखी एक पाऊल उचलले आहे. पुढील काळात सरकार आणखी अधिकार देण्याची शक्यता आहे.

Leave a Comment