एकही रूपया न भरता घरी घेऊन जा रॉयल एनफिल्ड

जर तुम्ही रॉयल एनफिल्डची बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कंपनीने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. मंदीमुळे वाहनांची विक्री थंडावली आहे. यामुळे वाहनांची विक्री वाढवण्यासाठी कंपनी शानदार ऑफर्स आणत आहे.

(Source)

रॉयल एनफिल्डची बेस्ट ऑफर –

रॉयल एनफिल्डने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशी ऑफर आणली आहे, जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्राहक नवीन बाइक एकही रूपया डाउन पेमेंट न देता खरेदी करू शकतात. याशिवाय कंपनीची बाईक 2,490 रूपयांपेक्षा कमी ईएमआयवर देखील खरेदी करण्याची संधी आहे.

(Source)

एक्सचेंज ऑफर –

कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एक्सचेंज ऑफर आणली असून, यामध्ये ग्राहक आपली जुनी बाईक एक्सचेंज करू शकतात व नवीन बाईकवर देखील ऑफर्सचा फायदा घेऊ शकतात. ईएमआयचे कॅलक्युलेशन हे चार वर्षांसाठीच्या लोनवर प्रती लाखांवर केले जाते. तसचे, जुन्या गाडीच्या अनुमानित किंमतीमधून तुमचे डाउन पेमेंट कमी केले जाईल. त्यामुळे तुम्हाला एकही रूपया भरावा लागणार नाही.

(Source)

2,490 रूपयांपासून ईएमआय सुरू –

कंपनीची सर्वात कमी ईएमआयची ऑफर ही कंपनीचे बेस मॉडेल बुलेट 350 एक्सवर आहे. या ऑफर्समुळे कंपनीला वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ होईल असे वाटत आहे. या ऑफर्सबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही कंपनीच्या डिलर्सशी संपर्क करू शकता.

 

Leave a Comment