आता क्राईम ड्रामा बनवणार संदीप रेड्डी वांगा


दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘कबीर सिंग’ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटाचा कबीर सिंग हा रिमेक होता. विजय देवरकोंडाने ‘अर्जुन रेड्डी’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तर, शाहिद कपूर आणि कियारा आडवाणीची जोडी ‘कबीर सिंग’मध्ये झळकली होती. या चित्रपटानंतर आता संदीप रेड्डी वांगा हे गुन्हेगारीवर आधारित चित्रपट तयार करणार आहेत.


संदीप वांगा रेड्डी हे ‘कबीर सिंग’च्या लव्हस्टोरीनंतर आता क्राईम ड्रामा तयार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि मुराद खेतानी करणार आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाची माहिती सोशल मीडियावर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही शेअर केली आहे. चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे देखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Leave a Comment