या कुटुंबाचा नोबेल पुरस्कारने सर्वाधिक वेळा सन्मान

रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, लिथियम आयन बॅटरी विकसित करण्यासाठी जॉन बी. गुडइनफ, एम. स्टॅनली व्हायटिंघम आणि अकिरा योशिनो या शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा परिवाराबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी सर्वाधिक वेळा नोबेल पुरस्कार जिंकण्याचा विक्रम केला आहे.

(Source)

हा विक्रम क्यूरी परिवाराच्या नावावर आहे. नोबेल पुरस्काराच्या इतिहासात क्यूरी परिवाराने सर्वाधिक वेळा नोबेल पुरस्कार जिंकला आहे.

(Source)

मेरी क्यूरी आणि पिअरे क्यूरी –

मेरी क्यूरी या फ्रान्सच्या नागरिक होत्या. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 ला पोलंडमध्ये झाला होता. त्यांचे वडिल गणित आणि भौतिक विज्ञानाचे शिक्षक होते. मेरी 9 वर्षांच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले.

1891 मध्ये त्या शिक्षणासाठी पॅरिसला आल्या. तेथे त्या दिवसरात्र प्रयोगशाळेत काम करत असे व रात्रभर परिक्षांची तयारी करायच्या. 1894 मध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांची भेट फ्रान्सच रसायन शास्त्रज्ञ पिअरे क्यूरी यांच्याशी झाली. दोघांनी लग्न देखील केले.

त्याचवेळी फ्रान्सच्या एक भौतिकशास्त्रज्ञ बॅक्युरेल यांनी युरेनियमच्या काही उत्सर्जन किरणांचा शोध लावला होता.  मेरी आणि पिअरे हे या बातमीमुळे उत्साहित झाले व त्यांनी या दिशेत काम करण्यास सुरूवात केली.  त्यांनी युरेनियमद्वारे निघणाऱ्या 100 पट अधिक रेडिअम उत्सर्जनाचा शोध लावला. चार वर्ष प्रयोग केल्यानंतर दोघे 1902 मध्ये 1/10 ग्राम रेडिएशन काढू शकले.

त्यानंतर 1903 मध्ये दोघांना संयुक्तपणे भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला.

(Source)

1906 मध्ये एका अपघातात  पिअरे क्यूरी यांचे निधन झाले. मात्र पतीच्या निधनांनतर देखील मेरी क्यूरी यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. काही वर्षांनीच 1911 मध्ये परमाणू संबंधित शोधासाठी त्यांना रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला.

मात्र सतत रेडिएशन तत्वांमध्ये राहिल्याने त्यांना ल्युकीमिया झाला व त्यांचे निधन झाले.

(Source)

आयरेन जोलिओट क्यूरी –

आयरेन जोलिअट क्यूरी ही मेरी आणि पिअरे क्यूरी यांची मुलगी आहे. त्यांचे औपचारिक शिक्षण अधिक झाले नसले तरी त्यांना भौतिक विज्ञानाची अधिक माहिती होती. आईच्या रेडिअम इंस्टिट्यूटमध्ये बसून आयरेन संशोधन करू लागल्या.

1926 मध्ये आयरेन क्यूरी यांनी फ्रेडरिक जोलिओट यांच्याशी लग्न केले. दोघांनी मिळून मनुष्याद्वारा निर्मित रेडिओएक्टिव तत्वांसंबंधित शोध लावला आहे. आपल्या आईप्रमाणेच 1956 मध्ये आयरेन यांचे देखील ल्युकीमियामुळे निधन झाले.

1935 मध्ये दोघा पती-पत्नींना रसायन शास्त्रातील कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला.

(Source)

फ्रेडरिक जोलिओट –

फ्रेडरिक जोलिओट यांनी एका स्टील कंपनीमध्ये प्रोडक्शन इंजिनिअर म्हणून काही महिने काम केल्यानंतर रसायनशास्त्रात काम करण्यास सुरू केले. त्यानंतर मेरी क्यूरी यांच्या रेडिअम इंस्टिट्यूटमध्ये त्यांचे सहकारी म्हणून काम केले. तेथेच त्यांची भेट मेरी क्यूरी यांची मुलगी आयरेन क्यूरी यांच्याशी झाली होती.

Leave a Comment