तुम्ही पाहिला आहे का सोने आणि हिऱ्याने जडवलेला आयफोन 11 प्रो


आयफोन 11 प्रोचे नवीन लग्झरी डिझाईन रशियन कंपनी caviar ने लाँच केले आहे. विक्ट्री असे या नवीन मॉडेलच नाव ठेवण्यात आले आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे आयफोन 11 प्रोच्या नवीन मॉडेलच्या मागील बाजूस सोने आणि हिरे जडलेले आहेत.

या आयफोन 11 प्रोच्या मागील बाजुस कोरण्यात आलेला ‘V’ लेटर रिअर पॅनलला दोन भागांमध्ये विभागतो. नुकताच लाँच झालेल्या iPhone 11 सीरिजच्या फोनच्या चौकार सेटअपमुळे अॅपल कंपनी ट्रोल करण्यात आल्यामुळे नव्या डिजाईनच्या कॅमेरा सेटअपमध्ये caviar ने याला गायब केले आहे. आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो Max या दोन्ही लिमिटेड एडिशनचे वेगवेगळे हॅण्ड-क्राफ्टेड डिजाईन उपलब्ध आहेत. नवीन आयफोन डिजाईनला शॉक-प्रुफ बॉडीला मजबूत मेटल फ्रेमने Caviar ने कव्हर केले आहे.

एडिशनल स्क्रीन प्रटेक्शनसोबत या डिवाईसची किंमत 4,000 डॉलर म्हणजेच जवळपास 2,84,000 रुपयांपासून सुरु होईल. विक्ट्री टायटेनिअम यापैकी सर्वात स्वस्त व्हेरिएंट आहे. 64 जीबी स्टोरेज असलेल्या या आयफोनची किंमत 4,290 डॉलर म्हणजेच जवळपास 3,40,000 रुपये एवढी आहे. स्टोरेज आणि आणखी चांगल्या व्हेरिएंटसाठी ही किंमत आणखी वाढेल.

12,000 डॉलर म्हणजेच जवळपास 8,50,000 रुपये इतकी बॅक पॅनलवर ब्लॅक एलिगेटर लेदर फिनीशसोबत या लग्झरी स्मार्टफोनची किंमत आहे आणि सोन्याच्या डिजाईनची किंमत तब्बल 30,820 डॉलर म्हणजेच जवळपास 21,88,000 रुपये आहे. तर हिरे जडीत आयफोन 11 प्रोची किंमत सोन्याच्या आयफोनच्या दुप्पट आहे.

Leave a Comment