बाजारपेठेत येण्यासाठी सज्ज झाला गुगलचा 5जी स्मार्टफोन

गुगल आपले नवीन स्मार्टफोन गुगल पिक्सेल 4 आणि पिक्सेल 4 एक्सएल 15 ऑक्टोंबरला लाँच करण्याची शक्यता आहे. याचबरोबर कंपनी आपला पहिला 5 जी स्मार्टफोन लाँच करेल. आपल्या 5 जी स्मार्टफोनमुळे कंपनी अॅपलला टक्कर देईल. अॅपलचे 5जी मॉडेल 2020 च्या सुरूवातीला लाँच होण्याची शक्यता आहे. गुगल पिक्सेल 4 एक्सएल 5 जी टॉप-लाइन स्पेसिफिकेशनसोबत लाँच करण्याची शक्यता आहे. यामध्ये 8 जीबी रॅम दिली जाऊ शकते.

(Source)

गुगल Pixel 4 XL 5G –

वृत्तांनुसार, Google 5G फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रँगन 855 प्रोसेसर असेल.  तसेच Geekbench लिटिंगद्वारे हा फोन चालेल. फोनमध्ये 8 जीबी रॅम देण्याची शक्यता आहे. कंपनी या 5G मॉडेलला आपल्या पुढील हार्डवेअर इव्हेंटमध्ये लाँच करू शकते. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. 2020 मध्ये अॅपल देखील 5 जी असलेला आयफोन लाँच करणार आहे.

(Source)

या कंपन्या देखील आणणार 5 जी स्मार्टफोन –

अॅपल आणि गुगलने अद्याप अधिकृतरित्या 5 जी स्मार्टफोनची घोषणा केलेली नाही. मात्र इतर कंपन्यानी आपले 5 जी स्मार्टफोन लाँच केले आहेत. ह्युवाईने मागील महिन्यात मेट 30 आणि मेट 30 प्रो हा 5 जी सपोर्ट स्मार्टफोन सादर केला होता. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने देखील Galaxy S10, Galaxy Note 10+, Galaxy Fold हे 5G सपोर्ट स्मार्टफोन लाँच केले आहेत.

 

Leave a Comment