एकाच घरातील चारही भाऊ-बहिण आहेत आयएएस अधिकारी

तुम्ही अनेकदा वाचले असेल की, एकाच गावातून अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी बनले आहेत. गावच नाही तर तुमच्या आजुबाजूचे देखील काहीजण आयएएस अथवा आयपीएस झालेले असतील. मात्र आज आम्ही तुम्हा अशा कुटुंबाबद्दल सांगणार आहोत, ज्या घरातून एक, दोन नाहीतर तब्बल 4 जण आयएएस अधिकारी आहेत आणि हे चौघेही जण भाऊ-बहिण आहेत.

उत्तर प्रदेशच्या प्रतापगड येथे राहणाऱ्या अनिल मिश्रा यांना चार मुल आहेत. 3 मुले आणि 1 मुलगी असणाऱ्या अनिल मिश्रा यांना आपल्या चारही मुलांचा अभिमान आहे. असणार का नाही, त्यांची चारही मुल आयएएस अधिकारी आहेत.

अनिल मिश्रा यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या मुलांवर विश्वास होता की, ते एकदिवस नक्कीच काहीतरी चांगले काम करतील. मात्र त्यांना हे माहित नव्हते की, त्यांची चारही मुल देशातील एवढ्या मोठ्या पदांवर बसतील.

अनिल मिश्रा हे स्वतः एक सरकारी बँकेत मॅनेजर आहेत. सहज व साधे जीवन जगणाऱ्या एका वडिलांसाठी आपले चारही मुले सरकारी विभागात एवढे मोठे अधिकारी आहेत ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.

दोन मुलांनी मागील वर्षी परिक्षेमध्ये यश मिळवले होते. तर या वर्षी दोन लहान मुलांनी परिक्षेमध्ये पास होत आपल्या वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवले.

 

Leave a Comment