रॅनबॅक्सीचे माजी प्रमोटर शिविंदर सिंह यांच्यासमवेत चारजणांना अटक


नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी मोठी कारवाई करत जगातील आघाडीची कंपनी रॅनबॅक्सीचे माजी प्रमोटर शिविंदर सिंह यांच्यासह चार जणांना अटक केली. रॅनबॅक्सी ही देशातील एक नामांकित औषधनिर्माण संस्था आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई रिलिगेअर एंटरप्रायजेस लिमिटेडच्या तक्रारीवरून केली आहे.

या लोकांनी कंपनीचे पैसे इतरत्र वापरले असल्याचा आरोप रिलिगेअर एंटरप्रायजेसने केला आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा देखील आरोप केला आहे.

दरम्यान यापूर्वी देखील अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंगच्या आरोपावरून माजी रॅनबॅक्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मलविंदर सिंह आणि शिवेंद्र मोहन सिंह यांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. कथित आर्थिक अनियमिततेच्या आरोपावरून या दोन भावांवर कारवाई करण्यात आली आहे.

सिंगापूरस्थित एका कंपनीला त्यांना 3500 कोटी रुपये देणे आहे, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना पैसे देण्यास सांगितले आहे. न्यायालयाने या दरम्यान असेही म्हटले आहे की, हा देशाशी निगडीत प्रश्न आहे, कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या प्रतिष्ठेशी संबंधित नाही. न्यायालयाने सांगितले की तुम्ही एकेकाळी तुमची फार्मा उद्योग क्षेत्रीशी निगडीत ओळख होती आणि आपण न्यायालयात यावे हे योग्य नाही.

दरम्यान रॅनबॅक्सी ही कंपनी केवळ एक देशातच नव्हे तर एक जागतिक पातळीवरील प्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीची 2008मध्ये जपानी कंपनी दाईची सॅनक्योनी खरेदी केली. यानंतर दाईची सॅनक्योनी रॅनबॅक्सीला पुन्हा एकदा सनफार्मला विकले.

Leave a Comment