२०० कोटींवर नववीच्या मुलाने सोडले पाणी

recmed
वॉशिंग्टन- हसण्या, खेळण्याचे आणि बागडण्याचे १४ वर्ष हे वय असते असे म्हणतात. त्यातच नववीच्या वर्गात असताना १० वीचा पाया पक्का करा कारण त्यावर तुमचे भवितव्य अवलंबून आहे असे म्हटले जाते. परंतु, अमेरिकेतील एका किशोरवयीन मुलाने आपला स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि चक्क ३० मिलियन डॉलर्स किंवा सुमारे २०० कोटी रुपयांवर त्याने पाणी सोडले.

माझी कंपनी विकण्यासाठी किमान ३३५ कोटी रुपये मोजावे लागतील असे तो ठामपणे म्हणतो. रेकमेड नावाची एक व्हेंडिंग मशिन ओपेलिका येथे राहणाऱ्या टेलर रोसेनथेलने तयार केली आहे. या मशिनद्वारे प्राथमिक उपचाराचे साहित्य मिळते. हे मशिन्स स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मॉल्स आणि अम्यूजमेंट पार्कमध्ये असावेत असे टेलरला वाटते. याठिकाणी गेल्यानंतर किरकोळ जखम झाली तर लोकांना प्रथमोपचारासाठी अनेक तास ताटकळत उभे राहावे लागते. तेव्हा जर त्यांना व्हेंडिंग मशिनने हे साहित्य पुरविण्यात आले तर त्यांचा त्रास वाचेल या उद्देशाने टेलरने हे मशीन तयार केले आहे. ५० मिलियन डॉलर्स मिळाले तर माझ्या व्यवसाय वृद्धीसाठी त्याचा उपयोग होईल असे टेलर म्हणतो.

Leave a Comment