शाओमीची भारतात ५ वर्षे पूर्ण- ग्राहकांना मिळणार सरप्राईज


चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतीय बाजारात व्यवसायाची पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली असून त्यानिमित्त प्रथमच त्यांच्या ग्राहकांचा ५०० कोटीच्या फायदा करून देण्याची तयारी केली आहे. कंपनीचे भारतातील प्रमुख मनुकुमार जैन यांनी या संदर्भात ट्विटरवरून माहिती दिली असून शाओमीच्या रेडमी ८ चे फोटो शेअर केले आहेत. शाओमी त्याच्या या यशाचे सेलेब्रेशन भारतीय ग्राहकांना रेडमी ८ हा नुकताच लाँच झालेला ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोरेजच्या फोनच्या किमतीत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचा फोन देणार आहे. याचा फायदा पहिल्या ५० लाख ग्राहकांना मिळणार आहे. या फोनची किंमत ७९९९ रुपये आहे.

मनुकुमार जैन लिहितात, आम्ही भारतीय बाजारात ५ वर्षे पूर्ण केली आहेत आणि त्यामुळे आता आमच्या ग्राहकांना सरप्राईज देण्याची हीच योग्य वेळ आहे. प्रथम येणाऱ्या ५० लाख ग्राहकांना रेडमी ८ चे ४ जीबी रॅम, ६४ जीबीचे व्हर्जन ७९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे. या निमित्ताने ग्राहकांना ५०० कोटींचे हे गिफ्ट दिले जात आहे. ज्यांनी ३ जीबी साठी बुकिंग केले आहे त्यानाही फोन ४ जीबीवर अपग्रेड करून दिला जाणार आहे. जैन यांच्या ट्विटरला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मिडियावर # ४ जीबी,६४ जीबी ट्रेंड होऊ लागले असून अनेकांना शाओमीचे अभिनंदन केले आहे.

या फोनसाठी ६.२२ इंची एचडी, स्प्लॅशप्रुफ कोटिंग असून कॉर्निग गोरीला ग्लास ५ चे संरक्षण दिले गेले आहे. ड्युअल सीम, मायक्रोएसडी कार्डची सुविधा त्याला दिली गेली आहे. तीन कलर मध्ये हा फोन उपलब्ध आहे.

Leave a Comment