या न्यायालयात यमराजावर दाखल झाला खटला


देशभरातील न्यायालयात अनेक प्रकारचे खटले चालू असतात. संपत्ती, वाटण्या, अपहरण, चोऱ्या, खून, दरोडे, फसवणूक असे अनेक प्रकारचे दावे कोर्टात दाखल असतात. बहुतेक वेळा त्यात माणसेच आरोपी आणि वादी असतात. क्वचित कधी जनावरांच्या विरोधातही दावा दाखल केला जातो. कोलकाताच्या हायकोर्टात मात्र चक्क मृत्यूचा देव यमराज याच्याविरोधात दावा दाखल केला गेला आहे. या दाव्यामुळे न्यायाधीश सुद्धा हतबुद्ध झाले असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार खुन केल्याच्या आरोपावरून दोघांना खालच्या न्यायालयात शिक्षा सुनावली गेली होती मात्र शिक्षा भोगण्यापूर्वीच या आरोपींचा मृत्यू ओढवला. त्यामुळे नातेवाईकांनी यमराजाला दोषी ठरविण्याची मागणी न्यायालयाकडे केली. त्यांनी न्यायालयाने यमराजाला या दोघांना पुन्हा जिवंत करावे म्हणजे ते त्यांची शिक्षा भोगू शकतील असा आदेश द्यावा अशी मागणी केली आहे. यमाने आदेश न पाळल्यास न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी या लोकांनी केली आहे.

पश्चिम बंगालच्या गुरुलीया गावात १९८४ मध्ये समर चौधरी व त्यांची दोन मुले ईश्वर आणि प्रदीप यांनी एका माणसाला इतकी मारहाण केली की त्यात त्या माणसाचा जीव गेला. त्याविरुद्ध दाखल झालेल्या खटल्यात या तिघा आरोपींना ५ वर्षाची शिक्षा सुनावली गेली. त्यावर हायकोर्टात अपील केले गेले तेव्हा या शिक्षेवर स्थगिती दिली गेली. मात्र हायकोर्टात सुनावणी सुरु होण्यापूर्वीच प्रदीप आणि समर यांच्या मृत्यू झाला. त्यामुळे यमराजावर गुन्हा दाखल करावा असा दावा नातेवाईकानी दाखल केला आहे.

Leave a Comment