जपानी प्रयोगशाळेत बनले कृत्रिम रक्त


वैद्यकीय शास्त्र अतिशय वेगाने प्रगत होत आहे आणि त्यामुळे अनेक असाध्य रोगांवर उपचार सहज, सुलभतेने करता येत आहेत. असे असले तरी मानवी रक्ताचे कोडे संशोधकांना अजून सुटलेले नाही. प्रयोगशाळेत कृत्रिम रक्त बनविण्याचे अनेक प्रयोग दीर्घ काळ सातत्याने सुरु आहेत. लवकरच त्याला चांगले यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जपानी वैज्ञानिकांनी कोणत्याची रक्तगटाच्या माणसाला सुट होईल असे रक्त बनविण्यात यश मिळविले आहे. या कृत्रिम रक्तातील लाल पेशी त्याच्यासोबत प्राणवायू आणि प्लेटलेट वाहून नेण्यास सक्षम ठरल्या आहेत.

जेव्हा माणसाला जखम होते तेव्हा त्यातून वाहणारे रक्त लालपेशीतील प्लेटलेटमुळे गाठ तयार होऊन वाहायचे थांबते. वैज्ञानिकांनी शरीरात अतिशय कमी रक्त असलेल्या दहा सश्यांना हे कृत्रिम रक्त दिले तेव्हा त्यातील सहा ससे जगले असे दिसून आले. अति रक्तस्त्राव झाला तर माणसाचा मृत्यू ओढवू शकतो. त्यात माणसाला वेळीच रक्त पुरविले गेले तर त्याचे प्राण वाचू शकतात. पण समजा असे लोक दुर्गम भागात असतील तर तेथे रक्ताचा पुरेसा साठा असेलच याची खात्री नसते तर अनेकदा अतिरक्तस्राव होत असलेल्या माणसाला रुग्णालयात हलविले गेले तरी तेथे प्रथम त्याच्या रक्ताच्या तपासण्या करून नंतर त्याला सुट होईल ते रक्त दिले जाते यातही अनेकदा महात्वाचा वेळ वाया जाण्याचा धोका असतो.

यामुळे कुठल्याची रक्तगटाशी मॅच होऊ शकेल असे कृत्रिम रक्त असणे ही महत्वाची गरज ठरली होती. जपानी वैज्ञानिकांनी बनविलेले रक्त त्यासाठी योग्य ठरेल असे सांगितले जात आहे. तोकोरोजावा येथील नॅशनल डिफेन्स मेडिकल कॉलेज मधील वैज्ञानिकांनी हे रक्त तयार केले आहे. मनुबा किनोशिवा यांच्या टीमने त्यासाठी प्रयोग केले असल्याचे समजते.

Leave a Comment