चक्क टाकाऊ वस्तूंपासून बनवले घर

bottle
श्रीगंगानगर- आपण आजवर दगड-विटांपासून तसेच लाकडी किंवा या फायबरपासून बनविलेली घर पाहिली असतील. मात्र, श्रीगंगानगरच्या एका तरुणाने चक्क टाकाऊ प्लाटिकच्या बॉटल्सपासून बनवले असून जयदित्य वीर सिंह नामक तरुणाने ज्या प्लास्टिकच्या बॉटल्सचा एकदा वापर करुन त्या फेकून दिल्या जातात. त्याच बॉटल्सपासून त्याने आपले घर उभारले आहे. राजस्थान सरकारने त्याच्या या प्रकल्पाचे कौतुक केले असून, सरकारने त्याला ब्रँड अम्बेसडर म्हणून नियुक्त केले आहे.

जो मार्ग पदमपुरच्या जयदित्य वीरने अवलंबला आहे, त्यामुळे या बॉटल्सचा योग्य आणि दिर्घकाळ वापर होणार आहे. खरतर जयदित्य वीरच्या डोक्यात या बॉटल्सपासून घर बनविण्याचा कल्पना आली. अशी आगळी-वेगळी कल्पना सुचताच जयदित्य वीर आणि त्याच्या मित्रांनी लगेच कामाला सुरुवात केली. या प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये रेती भरुन त्याला विटांच्या जागी वापरण्यात आले. बघता बघता घराच्या ४ खोल्या तयार झाल्या.

एका बॉटलला दुसरी बॉटल जोडून कामगारांनी या बंगल्याच्या भिंती उभारल्या. विशेष म्हणजे या खोल्या अशा तयार करण्यात आल्या आहेत, ज्या उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहतील. घरात हवा आणि प्रकाश येईल याचा देखील पद्धतीने रचना करण्यात आली आहे. प्लास्टिकच्या बॉटल्सपासून खोल्या बनल्यानंतर पुढे त्यांना आणखी देखील कल्पना सुचत गेल्या. खोल्या बांधून झाल्यावर त्यांना लाईटसाठी सोलारची मदत घेतली. बाजार अगदी स्वस्त मिळणारे सोलर पॅनल घेऊन त्याला एलईडी लाईट्स जोडण्यात आले. सौरइर्जेमुळे चार्ज होणाऱ्या बॅटरीपासून घरात प्रकाश आला.

दूर-दूरुन लोक आगळ्या-वेगळ्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या या घराला पाहण्यासाठी येत आहेत. तसेच तोंडभरुन कौतुक देखील करत आहे. ऐवढेच नाही तर सरकारला देखील ही संकल्पना आवडली असून, त्यांनी याला स्किल डेव्हल्पमेंटशी जोडून घेतले आहे. सोबतच ही कल्पना सत्यात उतरविणाऱ्या जयदित्य वीर सिंहला या प्रोजेक्टचा ब्रँड अम्बेसडर बनविण्यात आले आहे.

Leave a Comment