असा चालतो ‘कस्टम ड्युटी’च्या नावाखाली भ्रष्टाचार

social-media
मुंबई : सध्या सोशल मीडियात छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या टर्मिनल – २ वरचा एक व्हिडिओ चांगलाच गाजतो आहे. येथील अधिकारी ‘कस्टम ड्युटी’च्या नावाखाली सामान्यांकडून कसे पैसे उकळतात, याचेच हे आणखी एक उदाहरण आहे.

फेसबुकवर हा व्हिडिओ मेघराज सोनावणे या मूळच्या महाराष्ट्रीयन तरुणाने शेअर केला आहे. लंडनमध्ये बिझनेसमन असलेल्या या तरुणाकडे मुंबई विमानतळावर उतरला असताना फ्रान्सवरून आणलेली काही चॉकलेट सोबत आणली होती. या चॉकलेटवर कस्टम ड्युटी असल्याचे सांगत कटकटीतून बाहेर पडण्यासाठी पोलिसांनी या तरुणाकडून ४००० रुपये उकळले. हा सगळा प्रकार मेघराजने आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्यामुळे या अधिकाऱ्यांचा भांडाफोड झाला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. मेघराजने हा व्हिडिओ ९ मे रोजी फेसबुकवर पोस्ट केला. त्यावर अनेक उलट – सुलट चर्चाही झालेल्या पाहायला मिळाल्या. परंतु, अधिकाऱ्यांचा हा भ्रष्टाचार आपणही अनुभवल्याचे अनेकांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत ९,१४८ जणांनी शेअर केला आहे तर २ लाख ६ हजारहून अधिक जणांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

Leave a Comment