अखेर माघारी फिरला मान्सून


गेल्या ५९ वर्षानंतर पुन्हा एकदा खूप उशिरा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. यंदा देशभर मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला असून यापूर्वी १९६० मध्ये असा एक महिना उशिराने मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला होता. बुधवारी हवामान विभागाने पंजाब, हरियाना आणि उत्तर राजस्थान मधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्याची घोषणा केली आहे. आता उत्तर भारतातून तो माघारी परतत आहे.

१९६१ मध्ये मान्सून परतीची प्रक्रिया १ ऑक्टोबरला सुरु झाली होती. यंदा देशाच्या अनेक भागात प्रचंड पाउस झाला आहे. दोन दिवसात दिल्ली, उत्तर प्रदेशमधून मान्सून माघारी फिरेल, त्यानंतर दोनतीन दिवसात तो मध्य भारतातून पाय काढता घेईल. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपत्रा म्हणाले, आता वाऱ्याच्या दिशेत बदल होत आहेत. हवेतील आर्द्रता कमी झाली आहे त्यामुळे तापमानात घट होऊ लागली आहे. पश्चिम राजस्थानातून बहुतेक वेळा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो आणि १ ते दीड महिन्यात मान्सूनचा हा प्रवास पूर्ण होतो.

Leave a Comment