पांड्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केलेल्या ट्विटला झहीर खानचे उत्तर

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मात्र सर्वाधिक चर्चा भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने दिलेल्या शुभेच्छांची झाली.

हार्दिक पांड्याने झहीर खानला शुभेच्छा देताना एका जुन्या सामन्यातील झहीर खानच्या गोलंदाजीवर षटकार मारतानाचा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, हॅप्पी बर्थडे झॅक, आशा आहे की, तु देखील माझ्याप्रमाणेच पार्कच्या बाहेर बॉल पाठवशील.

हार्दिकने केलेले हे ट्विट नेटकऱ्यांना आवडले नाही व त्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. हार्दिकच्या या ट्विटवर झहीर खानने देखील ट्विट करत त्याला मजेशीर उत्तर दिले.

झहीर खानने ट्विट केले की, हा हा हा… तुझ्या शुभेच्छांसाठी धन्यवाद हार्दिक….माझी बँटिग स्कील कधी तुझ्यासारखी होऊ शकत नाही. मात्र माझा वाढदिवस तेवढाच चांगला होता, जशाप्रकारे माझ्या पुढील बॉलचा तू सामना केलास.

सध्या हार्दिक पांड्या पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे क्रिकेटपासून लांब आहे. पुढील 4-5 महिने तो क्रिकेट खेळू शकणार नाही.

 

Leave a Comment