10 मिनिटात 177 कोटींना विकली गेली ही पेटिंग

हाँगकाँगमध्ये सध्या चीन सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शन करण्यात येत आहेत. या प्रदर्शना दरम्यानच हाँगकाँगमध्ये एका जापानी पेटिंगची तब्बल 177 कोटी रूपयांमध्ये विक्री झाली आहे. मॉर्डनस्टिक कन्वेंशन सेंटरमध्ये या ‘नाइफ बिहाइंड बँक’ नावाच्या पेटिंगची विक्री झाली. 6 लोकांनी या पेटिंगसाठी बोली लावली होती. केवळ 10 मिनिटांमध्ये या पेटिंगची विक्री झाली.

सोथबी ऑक्शन हाउसने निश्चित केलेल्या रक्कमेपेक्षा अधिक 10 पट या पेटिंगसाठी बोली लागली. जापानी कलाकार योशितमो नाराने या कार्टुन गर्लला वर्ष 2000 मध्ये बनवले होते.

याआधी सोथबी ऑक्शन हाउसने चीनी कलाकार सेन्यूच्या एका पेटिंगचा लिलाव 178 कोटींमध्ये केला होता. पेटिंगमध्ये एक न्यूड महिला दाखवण्यात आली होती. यासाठी चार लोकांनी बोली लावली होती. पेटिंगसाठी सुरूवातीची किंमत 134 कोटी रूपये निश्चित करण्यात आली होती. साउथी ऑक्शन हाउसने पाच दिवसीय लिलावात 20 वस्तू लिलावासाठी ठेवल्या आहेत. याद्वारे 23 अब्ज रूपयांचा व्यापार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीनच्या दुर्मिळ पाउच आकाराच्या ग्लास वेसची 162 कोटी रूपये किंमत ठरवण्यात आलेली आहे.

Leave a Comment