रामचरणच्या पत्नीने तमन्नाला दिला एवढा कोटींचा हिरा गिफ्ट


नुकताच अभिनेत्री तमन्ना भाटियाचा चित्रपट ‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ रिलीज झाले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते चिरंजीवी आणि बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या महत्वाच्या मुख्य भूमिका आहे. अभिनेता रामचरणच्या पत्नीने या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री तमन्ना भाटिया च्या अभिनयाचे कौतुक करून एक खूप महागडे गिफ्ट दिले आहे. तमन्ना भाटियाला रामचरणची पत्नी उपासनाने जगातील पाचवा सर्वात महागडा हीरा गिफ्ट म्हणून दिला आहे. सोशल मीडियावर तमन्ना भाटियाचा या हिऱ्यासोबतचा एक फोटो उपासना कामिनेनीने शेअर केला आहे. तमन्ना या फोटोमध्ये आपल्या बोटातील हा हिरा दाखवत आहे.

उपासना कामिनेनीने तमन्नाचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, एक गिफ्ट सुपर तमन्ना भाटियासाठी श्रीमती निर्मतीकडून, तुझी आठवण येत आहे. उपासना कामिनेनीच्या या ट्विटवर तिचे फॅन्स आणि सोशल मीडिया यूजर्स कमेंट करत आहेत. न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार तमन्ना भाटियाला जो हीरा उपासना कामिनेनीने गिफ्ट म्हणून दिला आहे त्याची किंमत 2 कोटी रुपये सांगितली जात आहे.

Leave a Comment