पाकला भिखेचे डोहाळे, इम्रान खान यांनी केला कर्ज घेण्याचा विक्रम

डबघाईला गेलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने एक वर्षाच्या कार्यकाळात कर्ज घेण्याचा विक्रम केला आहे. अधिकृत आकड्यांनुसार, सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात देशाच्या एकूण कर्जामध्ये 7509 अब्ज (पाकिस्तानी) रूपयांची वाढ झाली आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने हे आकडे पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहेत.

ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2019 च्या काळात परदेशातून 2804 अब्ज रूपये आणि स्थानिक स्त्रोतांमधून 4705 अब्ज रूपयांचे कर्ज घेतले आहे.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या आकड्यांनुसार, सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीच्या दोन महिन्यात पाकिस्तानच्या सार्वजनिक कर्जात 1.43 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सार्वजनिक कर्ज हे 32,240 अब्ज रूपये झाले आहे. ऑगस्ट 2018 मध्ये हे कर्ज 24,732 रूपये होते.

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यात पाकिस्तान सरकारचा कर संग्रह हा 960 अब्ज रूपये आहे.

Leave a Comment