रसायन शास्त्राचा नोबेल पुरस्कार गुडइनफ, व्हिटिंघम आणि योशिनो यांना घोषित


मुंबई – आज रसायन शास्त्रातील २०१९ च्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. हा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे शास्त्रज्ञ जॉन गुडइनफ, ब्रिटनचे शास्त्रज्ञ स्टॅनली व्हिटिंघम आणि जपानचे शास्त्रज्ञ अकिरा योशिनो या तिघांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांना नोबेल पुरस्कार आयन बॅटरीच्या संशोधनासाठी जाहीर करण्यात आले आहे.

या पुरस्काराची घोषणा स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सचे जनरल सेक्रेटरी अॅलान रॉयल यांनी केली आहे. रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्स यांनी या पुरस्काराची घोषणा करताना सांगितले की, कमी वजन, रिचार्ज करणारी आणि पॉवरफुल बॅटरीचा वापर मोबाइल फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत सर्व ठिकाणी केला जातो.

Leave a Comment