एकदिवसीय क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारी मिताली जगातील एकमेव खेळाडू


महिला क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडूंमध्ये मिताली राज हिची गणना केली जाते. एक खास विक्रम भारताच्या महिला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट संघाची कर्णधार असलेल्या मितालीने आपल्या नावावर केला आहे. एकदिवसीय क्रिकेट खेळताना मितालीने आपल्या कारकिर्दीची २० वर्ष पूर्ण केली.


ती असा विक्रम करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिने २६ जून १९९९ मध्ये आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेवर लक्ष देण्यासाठी टी-२० क्रिकेटमधून तिने निवृत्ती घेतली होती. ३२ टी-२० सामन्यांमध्ये तिने टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये तीन टी-२० विश्वचषक स्पर्धांचा समावेश आहे.

मितालीने २०१२, २०१४ आणि २०१६ च्या टी -२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताकडून भाग घेतला होता. पण, भारताने तिच्या नेतृत्वाखाली एकदाही विश्वचषक उंचावलेला नाही. ८८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये मितालीने २३६४ धावा केल्या आहेत. या धावा करताना ३७.५२ ची तिची सरासरी राहिली आहे. या धावांमध्ये मितालीच्या १७ अर्धशतकांचा समावेश आहे. आत्तापर्यंत मितालीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०३ सामने खेळले आहेत. या सामन्यात खेळताना तिने ७ शतके आणि ५२ अर्धशतकांसह ६७२० धावा केल्या आहेत.

Leave a Comment