जागतिक टपाल दिन : तंत्रज्ञानमुळे लोकांचे आयुष्य सोशल मीडियापुरतेच मर्यादित

एक काळ असो होता जेव्हा लोक दिवस-रात्र पत्रांची वाट पाहत असे. मात्र बदलत्या काळाबरोबरच आणि तंत्रज्ञानाबरोबर मोबाईल, सोशल मीडियामुळे क्षणात कोणाशीही संवाद साधता येतो.

आज आंतरराष्ट्रीय टपाल दिवस आहे. 1969 पासून आंतरराष्ट्रीय टपाल दिन 9 ऑक्टोंबर रोजी साजरा केला जात आहे. मात्र आजच्या युवा पिढीला पत्र, पोस्टकार्ड आणि ग्रिटिंगचे महत्त्व हवे तेवढे वाटत नाही. एकेकाळी लोकांसाठी पत्र म्हणजेच सर्वकाही असे.

आयएएस अभिषेक गुप्ता यांनी सांगितले की, 27 वर्षांपुर्वी जेव्हा पहिल्यांदा अधिकारी झालो तेव्हा पहिल्यांदाच आई-वडिलांपासून लांब गेलो होतो. पहिली पोस्टिंग शिमला येथे झाल्यावर आई-वडिलांना पत्र पाठवण्यास सुरूवात केली. रोजची दिनचर्या लिहून आईला पाठवायचो व त्यांच्या पत्राची वाट पाहायचो.

20-25 वर्षांपुर्वी पत्र हे अनेकांच्या आयुष्याची लाइफ लाइन होते. मागील 20 वर्षांपासून पत्रांचा वापर कमी होत गेला आहे. आज पत्रांची जागा ई-मेल आणि सोशल मीडियाने घेतली आहे. लोक लांब असले तरीही पत्राद्वारे प्रेम व्यक्त करत असे, मात्र आज लोक आधुनिक तर होत आहेत, मात्र एकमेंकांपासून लांब जात आहेत.

वैज्ञानिक क्रांतीमुळे आज संपुर्ण विश्व एक गाव झाले आहे. वृध्द लोक सांगतात की, जेव्हा एखादे टेलीग्राम यायचे तेव्हा एक संकेत असायचा की, काहीतरी वाईट घडले आहे आणि जेव्हा एखादे पत्र यायचे तेव्हा लोक समजून जायचे की, काहीतरी आनंदाची बातमी आहे.

 

Leave a Comment