इंस्टाग्रामने युजर्ससाठी आणले खास फीचर

फोटो शेअरिंग अ‍ॅप इंस्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर आणत असते. आता इंस्टाग्रामने युजर्ससाठी डार्क मोड फीचर लाँच केले आहे. इंस्टाग्रामने आयओएस आणि अँड्राईड दोन्ही डिव्हाईससाठी हे फीचर रिलीज केले आहे. युजर्स डार्क मोड फीचरसाठी अ‍ॅप अपडेट करू शकतात.

इंस्टाग्रामचे डार्क मोड फीचर सध्या केवळ अँड्राइड 10 युजर्स आणि आयओएस 13 डिव्हाईस असणाऱ्या युजर्ससाठी रिलीज केले आहे. लवकरच इतर युजर्ससाठी देखील हे फीचर सुरू होईल. याचबरोबर इंस्टाग्राम एक्टिविटी फिडवरून फॉलोईंग टॅब काढून टाकण्याची तयारी करत आहे. या फिचरची टेस्टिंग ऑगस्ट महिन्यापासूनच करत आहे, मात्र या आठवड्यापासून हे फिचर सुरू करण्यात येईल.

काही दिवसांपुर्वीच इंस्टाग्रामने थ्रेड नावाचे अ‍ॅप लाँच केले आहे. हे अ‍ॅप स्नॅपचॅटला टक्कर देईल. थ्रेड अपद्वारे इंस्टाग्राम युजर्स आपल्या क्लोज फ्रेंडला लाईव्ह लोकेशन, गाडीचा स्पीड, बॅटरी लाईफ शेअर करू शकतील.

याचबरोबर इंस्टाग्राम युजर्सच्या सुविधेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित  नवीन शॉपिंग फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सला एखादे प्रोडक्ट खरेदी करण्यापुर्वी ट्राय करता येणार आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स बघू शकतील की, एखादे प्रोडक्ट त्यांच्यावर चांगले दिसत आहे की नाही.

Leave a Comment