या वर्षात गुगलने बंद केल्या या 10 सेवा

जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी गुगलचे अनेक प्रोडक्टसचा वापर मोबाईलपासून ते डेस्कटॉप डिव्हाईसवर कितीतरी कोटी युजर्स करतात. गुगलचे सर्वाधिक वापरले जाणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये जीमेल, सर्च इंजिन आणि युट्यूब हे आहेत. गुगलने आजपर्यंत असंख्य प्रोडक्ट्स आणि अप्स लाँच केले आहेत. मात्र गुगलने अनेक सर्विसेज आणि प्रोडक्ट्सला युजर्सचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे बद देखील केले आहेत. आज आम्ही तुम्हाला गुगलने 2010 मध्ये बंद केलेल्या 10 सर्विसेज आणि प्रोडक्ट्सविषयी सांगणार आहोत.

(Source)

गुगल+ – 

गुगलने आपली सोशल वेबसाईट गुगल+ या वर्षी पुर्णपणे बंद केली आहे. कंपनीच्या सर्वाधिक दिवस चाललेल्या या नेटवर्कला 8 वर्षानंतर बंद करण्यात आलेले आहे.

(Source)

गुगल अल्लो –

कंपनीने इंटरनेट बेस्ड टेक्स्ट मेसेजिंग अॅप गुगल अल्लो देखील बंद केले आहे. या सर्विसला गुगल चॅट नावाने देखील रिब्रँड देखील करण्यात आले होते.

(Source)

इंनबॉक्स बाय जिमेल –

गुगलच्या या सर्विसचे अनेक फीचर्स आधीपासूनच जीमेल अॅपमध्ये आहेत. जवळपास 4 वर्ष जुन्या या सेवेला देखील कंपनीने बंद केले आहे.

(Source)

युट्यूब गेमिंग –

कंपनीने व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म युट्यूबचे गेमिंग व्हिडीओज आणि लाईव्ह स्ट्रिमिंगवर फोक्स करणारी सर्विस देखील याच वर्षी बंद केली. ही सर्विस कंपनीने 4 वर्षांपुर्वी सुरू केली होती.

(Source)

गुगल युआरएल शॉर्टनर –

एखाद्या युआरएलला शॉर्ट करण्यासाठी या सर्विसचा वापर करता येत असे. गुगलच्या सर्वात जुन्या सर्विसेज पैकी एक युआरएल शॉर्टनरला देखील कंपनीने बंद केले आहे. ही सर्विस 9 वर्ष जूनी आहे.

(Source)

युट्यूब मेसेज –

व्हिडीओ शेअरिंग साईट युट्यूबने गेमिंग सर्विसबरोबरच युट्यूब मेसेजेस देखील बंद केले आहेत. या सर्विसद्वारे युजर्स युट्यूबवर थेट मेसेज करू शकत होते आणि व्हिडीओ शेअर करू शकते.

(Source)

अरेओ-

गुगलच्या अरेओ अपच्या मदतीने आपल्या आवडत्या रेस्टोरेंटमधून जेवण ऑर्डर करता येत होते. तसेच, आपल्यासाठी टेबल देखील बुक करता येत असे. हे अॅप देखील कंपनीने बंद केले आहे.

(Source)

क्रोमकास्ट ऑडिओ –

गुगलने क्रोमकास्ट ऑडिओ हार्डवेअर प्रोडक्ट देखील बंद केले आहे. 3 वर्षांपुर्वी लाँच करण्यात आलेल्या या प्रोडक्टच्या मदतीने युजर्स कोणत्याही डिव्हाईसद्वारे स्पीकरमध्ये ऑडिओ स्ट्रीम करू शकायचे.

(Source)

गुगल ट्रिप्स –

ट्रॅव्हिलिंगची आवड असणाऱ्यांना हे अॅप फायदेशीर होते. यावर फ्लाइट्स, हॉटेल, कार आणि रेस्टोरेंट रिझर्वेशन सुविधा मिळत असे. तीन वर्ष जुनी ही सर्विस देखील गुगलने बंद केली आहे.

(Source)

डाटा सेव्हर एक्सटेंशन –

गुगल क्रोमसाठी असलेले डाटा सेव्हर एक्सटेंशन देखील कंपनीने 4 वर्षानंतर बंद केले. याच्या मदतीने जास्त डेटा वापरल्याशिवाय वेब ब्राउजिंग करता येत असे.

Leave a Comment