या कारणांमुळे 7 डॉक्टर्स, 450 इंजिनिअर्सनी स्विकारली शिपाईची नोकरी

सध्या बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, पदवीधर झालेले देखील शिपाई पदासाठी अर्ज करताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वीच झालेल्या नियुक्ती प्रक्रियेत सात डॉक्टर आणि जवळपास 450 इंजिनिअर्सनी शिपाईची नोकरी स्विकारली आहे. यामागील कारण विचारल्यावर सर्वांनीच विचित्र उत्तरे दिली आहेत.

यामागे सरकारी नोकरी करण्याची ईच्छा किंवा त्यांच्या क्षेत्रामध्ये नोकरी न मिळणे हेच कारण आहे. शिपाई पदासहित वर्ग-4 च्या पदासाठी हजारोंच्या संख्येत डॉक्टर, इंजिनिअर्स आणि पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले होते.

ही भरती गुजरात उच्च न्यायालय आणि त्याच्या अखत्यारित असलेल्या न्यायालयासाठी घेण्यात आली होती. शिपाई पदासहित वर्ग-4 मधील पदासांठी 1149 पदांकरिता भरती होणार होती. यासाठी तब्बल 1,59,278 उमेदवारांनी अर्ज केले. यामधील 44,958 पदवीधर होते. निवड प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर 7 डॉक्टर, 450 इंजिनिअर्स आणि 543 पदवीधर उमेदवारांनी वर्ग-4 मधील नोकरी स्विकारली आहे. त्यांना 30 हजार रूपये प्रति महिना वेतन मिळेल.

ही नोकरी स्विकारण्यामागे उमेदवारांनी वेगवेगळे तर्क दिले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, ही एकतर सरकारी नोकरी आहे व दुसरे म्हणजे यात ट्रांसफरचा कोणताही त्रास नाही.

जे विद्यार्थ्यी जज बनण्यायोग्य सक्षम आहेत, त्यांनी वर्ग-4 पदासाठी देखाल अर्ज केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, एवढे शिक्षण घेऊन देखील आमच्या योग्यतेची नोकरी मिळत नाही. त्यामुळे अखेर शिपायाची नोकरी स्विकारावी लागत आहे.

 

Leave a Comment