केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्यात 5 टक्क्यांची वाढ


नवी दिल्ली – मोदी सरकारने यंदा दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचार्‍यांना बंपर गिफ्ट दिले आहे. आज राजधानी दिल्लीत झालेल्या कॅबिनेट बैठकीत कर्मचार्‍यांना 5% महागाई भत्ता वाढवून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्यामुळे देशभरातील केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता आता 12% वरून 17 % एवढा झाला आहे. हा निर्णय आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळातील बैठकीत झालेल्या या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाढवलेला महागाई भत्ता हा जुलै 2019 पासून दिला जाणार असल्यामुळे देशातील सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शर्स यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. तसेच सरकारच्या या निर्णयामुळे तिजोरीवर सुमारे 16 हजार कोटी रूपयांचा भार पडण्याची शक्यता आहे.

कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यामध्ये मागील वर्षभरात दुसर्‍यांदा वाढ करण्यात आली आहे. मोदी सरकारने त्यांच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात शेवटच्या काही दिवसांत केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनर्स यांना महागाई भत्ता 12% एवढा जाहीर केला होता. तो त्याआधी 9% होता. त्यावेळेस सरकारी तिजोरीवर 9168.12 कोटी भार पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

Leave a Comment