‘दगडी चाळ’च्या सिक्वेलची घोषणा


एक ओळखीचा चेहरा नवरात्रीतील नवमीला दगडी चाळ परिसरात अनपेक्षितपणे फिरताना दिसला. अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत तेथील स्थानिक रहिवाशांना चक्क त्यांचे ‘डॅडी’ दिसले. तेथील लोकांनी रुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक आलेला एक दरारा हे सर्व पाहून डॅडींना नमस्कार करायला सुरुवात केली.

पण अरुण गवळी यांची दगडी चाळ चित्रपटात भूमिका साकारलेले अभिनेते मकरंद देशपांडे असल्याचे काही वेळाने लक्षात येताच लोकांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. मकरंद देशपांडे यांनी चार वर्षांपूर्वी आलेल्या ‘दगडी चाळ’ चित्रपटात ‘डॅडी’ म्हणजेच अरुण गवळींची भूमिका साकारली होती. त्यांचा या चित्रपटातील ‘चुकीला माफी नाही’ हा डायलॉग तर हिटच झाला होता.

‘दगडी चाळ २’ आता लवकरच येत आहे. अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांची अधिकच फुलत जाणारी प्रेमकथा ‘दगडी चाळ २’ मध्ये पुन्हा पाहायला मिळणार आहे. संगीता अहिर मुव्हीजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा मकरंद यांनी दगडी चाळीत जाऊन केली.

Leave a Comment