पहिल्या राफेलवरच्या आरबी ००१ चा हा आहे अर्थ


विजयादशमीला भारतीय हवाई दलाला फ्रांस कडून पहिले राफेल लढाऊ विमान मिळाले असून संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी फ्रांस मध्येच विमानाचे शस्त्र पूजन करून विमान ताब्यात घेतले आहे. या पहिल्यावाहिल्या राफेल लढाऊ विमानाच्या शेपटीवर आरबी ००१ असा नंबर लिहिला गेला आहे. हा नंबर लिहिण्याचे कारण आहेत नुकतीच भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदाची धुरा घेतलेले एअर चीफ मार्शल राकेशसिंग भादौरिया. हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरबी ००१ हा नंबर राकेशकुमार सिंग भादौरिया यांच्या सन्मानार्थ दिला गेला आहे. त्यातील आर बी म्हणजे राकेशसिंग भादौरिया,

राफेल खरेदी संदर्भातील कराराला अंतिम रूप दिले गेले तेव्हा राकेशसिंग भादौरिया हवाई दलाचे उपप्रमुख होते. राफेल करारात यांची भूमिका फार महत्वपूर्ण होती. जुलै मध्ये झालेल्या भारत फ्रांस संयुक्त सरावादरम्यान राकेशसिंग भादौरिया यांनी राफेलमधून प्रथम उड्डाण केले होते.

मुळचे आग्रा रहिवासी असलेले राकेशसिंग भादौरिया यांनी ३० सप्टेंबरला एअर चीफ मार्शल पदावरून धनुआ यांची निवृत्ती झाल्यावर हवाई दल प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांच्या खात्यात ४२५० तास विमानोड्डाण करण्याचा अनुभव आहे. मे २०२० पर्यंत हवाई दलाच्या ताफ्यात आणखी चार, फेब्रुवारी २०२१ मध्ये १८ तर एप्रिल मे २०२२ पर्यंत सर्व ३६ राफेल भारतीय वायू दलाला मिळणार आहेत. जगात भारतीय वायू दल चार नंबरवर असून राफेलच्या सहभागानंतर हवाई दलाची क्षमता अनेक पटीने वाढणार असल्याचा दावा केला जात आहे.

फ्रांस कडून खरेदी करण्यात आलेल्या राफेल मध्ये भारतीय हवाई दलाच्या गरजेनुसार बदल करून घेतले गेले असून ही ट्विन जेट फायटर विमाने आहेत.

Leave a Comment