आता रस्तेच करणार इलेक्ट्रिक वाहने चार्ज


जगभरात हवा प्रदूषण हा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे आणि त्यामुळे हवा प्रदूषण न करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना जगभरातील सरकारे प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे. मात्र इलेक्ट्रिक वाहनांना म्हणावा तसा प्रतिसाद अद्यापी मिळालेला नही. त्यामागे अनेक कारणे आहेत. या वाहनाची बॅटरी महाग पडते त्यामुळे वाहनाची किंमत वाढते. चार्जिग स्टेशन पुरेश्या प्रमाणात नाहीत त्यामुळे दीर्घ प्रवासात ही वाहने न वापरण्याकडे कल दिसतो. ही वाहने चार्ज करण्यासठी वेळ अधिक लागतो. चार्जिग टाईम कमी करण्यासाठी संशोधक जोमाने काम करत आहेत. मात्र इस्राईल मधली स्टार्टअप कंपनी इलेक्ट्रोन नवीन तंत्रज्ञान घेऊन आली असून यात रस्तेच ही वाहने चार्ज करण्याचे काम करतील. त्यामुळे या रस्त्यांना स्मार्ट रोड असे म्हटले जात आहे.

इलेक्ट्रोनने एका शाळेच्या मैदानात असा स्मार्ट रोड चाचण्या घेण्यासाठीत तयार केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर सर्वप्रथम बसेस चार्जिंग केल्या जातील कारण त्यामुळे प्रदूषण वेगाने कमी होण्यास मदत होईल असे समजते. त्यात १ मैलाचा रस्ता इलेक्ट्रीफाय केला जात असून तो खासगी तसेच लोकल बस रस्त्याला जोडला जात आहे. या प्रकल्पासाठी ५३ लाख डॉलर्सची गुंतवणूक केली जात आहे. स्वीडन मध्येही स्मार्टरोड तयार केले जात असून तेथे ३ अब्ज डॉलर्स खर्चून १ हजार मैलाचा स्मार्ट रोड बनविला जाणार आहे.

इस्रायल मधील टेस्ट साईटवर रस्त्याच्या ९०० फुट काह्ली कॉपर कॉइल बसविली गेली असून त्यातून वायरलेस एनर्जी वहन करता येते. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. याच्यापुढचे पाउल म्हणजे या स्मार्ट रोड वरून चालकरहित वाहने दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस चालविता येणे शक्य असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Leave a Comment