शाम्पूपासून सावध

shampoo
केस धुण्यासाठी शाम्पूचा वापर हा आता सामान्य झाला आहे. मात्र शाम्पूसहीत अशा प्रकारच्या उत्पादनांमध्ये सापडणारी काही रसायने ती वापरणार्‍यांच्या आरोग्यासाठी मोठी घातक ठरू शकतात असे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका पाहणीत आढळले आहे. विशेषतः बॉडी लोशन्स आणि सनस्क्रिनमध्ये आढळणारी काही रसायने ही कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात, असा या पाहणीचा निष्कर्ष आहे. शाम्पूमध्ये आढळणारे पॅराबेन्स हे कर्करोगकारक असल्याचे संशोधकांना आढळले आहे.

पॅराबेन्स हे शाम्पूमध्ये किंवा इतरही अनेक वस्तूंमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरले जाते. ते शरिरामध्ये तशाच प्रकारच्या रसायनांच्या निर्मितीला गती देते. त्यामुळे स्तनांच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्नियातील संशोधक डॉ. डेल लिटमन यांनी म्हटले आहे. त्यांनी पॅराबेन्सवर अनेक प्रयोग केल्यानंतर त्यांना ही गोष्ट आढळली.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment