विक्की कौशल टरकतो हॉरर फिल्म्सना


माणूस कितीही शूर आणि धैर्यवान असला तरी त्याचा काहीतरी विक पॉईट असतोच. म्हणजे त्यालाही कशाची ना कशाची भीती वाटत असते. उरी द सर्जिकल स्ट्राईकचा हिरो विक्की कौशलही याला अपवाद नाही. एका मुलाखतीत बोलताना विक्कीने नुकतेच स्पष्ट केले की प्रत्यक्ष आयुष्यात तो बोल्ड आहे तरी पण एका गोष्टीला तो जाम टरकतो आणि ती गोष्ट म्हणजे हॉरर फिल्म. कोणताही हॉरर चित्रपट पाहायची वेळ आले तर चित्रपट पाहावा की नको यावर तो बराच विचार करतो.

विक्कीचा भूत पार्ट १ हा हॉरर चित्रपट प्रथम नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता तो आता फेब्रुवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. यात विक्कीच्या रुपाला प्रेक्षक टरकतील का नाही ते लवकरच समजेल. पण हॉरर चित्रपटाची भीती असलेल्या विक्कीने हा चित्रपट स्वीकारला कसा असे कुणाच्याही मनात येईल. विक्की सांगतो, हा चित्रपट त्याच्याकडे आला तेव्हा तो कथा कशी असेल, आपण त्याबरोबर कसे मॅनेज करणार या विचारात पडला होताच. त्याने कथा वाचली तेव्हा तो घाबरला होताच पण त्याच्या लक्षात आले की कथेत आपण गुरफटलो आहोत, त्यातले भाव आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहोत. आणि ही भूमिका करण्याचा त्याने निर्णय घेतला.

ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे असे सांगितले जात आहे. ही घटना मुंबईमध्ये घडली होती. या चित्रपटात विक्की सोबत भूमी पेडणेकर आहे.

Leave a Comment