लाल मिरची आवश्यकच

red-chilli
वजन नियंत्रणात राहण्यासाठी आरोग्य सांभाळले जावे म्हणून साधे जेवण करण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यामध्ये मसालेदार तसेच तिखट पदार्थ टाळण्यास सांगितले जाते. मात्र काही आहारतज्ञांच्या मते या सगळ्या पथ्यांमध्ये मिरचीचा समावेश करण्याची काही गरज नाही. मिरची ही अनावश्यक नाही. मिरची खाल्ल्याचे काही चांगले परिणामही माणसावर होतात. मिरचीमध्ये भूक शमवण्याची मोठी ताकद आहे. त्यामुळे जो माणूस मिरची भरपूर खाईल त्याचे जेवण आपोआपच कमी होईल.

मिरचीमध्ये कॅप्सियासीन हे अन्नघटक आहेत आणि ते माणसाचा उत्साह वाढवतात. मेंदूला चालना देतात आणि मेंदूला असे संदेश पोहोचवतात की मेंदू जिभेला अधिक तिखट खाण्याचा सल्ला देतो. भरपूर मिरची खाण्याच्या माणसाला गोड, तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थांविषयी एक प्रकारचा नॉशिया येतो. त्यामुळे त्याचे गोड, तेलकट तसेच अरबटचरबट प्रकार खाण्याचे प्रमाण आपोआपच कमी होते.

अधिक तिखट खाणार्‍या व्यक्तीला मीठ फार आवडत नाही आणि गोड पदार्थही आवडत नाहीत. त्यामुळे मिरची खाल्ली पाहिजे सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे पुरुषाची कामशक्ती मिरची खाल्ल्याने वाढते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment