येथे एकाच ठिकाणी आहेत तीन भैरव


राजस्थानच्या जोधपूर जिल्यातील छोटेसे गाव रजलाणी एका विशेष गोष्टीमुळे देशात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी एकाच मंदिरात दोन भैरव आणि शेजारच्या शिव मंदिरात आणखी एक भैरव आहे. म्हणजे येथे एकाच ठिकाणी तीन भैरव आहेत. यातील एका मंदिरात असलेल्या दोन भैरवाचे रूप आणि पूजा विधी वेगळे असून त्यांना काला भैरव आणि गोरा भैरव अशी नावे आहेत.

येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्याचे कारण आणखी वेगळे आहे. ज्या जोडप्यांना मुलगा हवा असेल ते येथे येऊन काला भैरवाची पूजा करून त्याला आपली इच्छा सांगतात व ज्यांना मुलगी हवी असेल ते गोरा भैरव पुजा करून त्याला आपली इच्छा सांगतात. काला भैरव पूजेत मद्य वापरले जाते तर गोरा भैरव पूजेत मिठाई वापरली जाते. हे मंदिर एका प्राचीन बावडीच्या आत आहे.

या बावडीच्या म्हणजे विहिरीच्या काठावर शंकर मंदिर असून त्यात आणखी एक भैरव आहे. भैरव ही हिंदू देवता शिवाचा अंश मानली जाते. शिवाच्या घामातून भैरव निर्माण झाला अशी भावना आहे. भारताशिवाय नेपाल मध्येही भैरव पूजा केली जाते. एकूण भैरव ६४ मानले गेले असून ते आठ विभागात विभागले गेले आहेत. तांत्रिक बाधा निवारणासाठी भैरव पूजा करण्याची प्रथा आहे. कालभैरवाची पूजा भारतभर केली जाते. मध्यप्रदेशच्या उज्जैन नगरीत अष्टभैरव आहेत. त्यांना महांकाळाचे नगर कोतवाल मानले जाते.

Leave a Comment