महाराष्ट्राच्या या छोट्या खेड्यात होते रावणपूजा


देशात काल साजऱ्या झालेल्या विजयादशमीला विविध ठिकाणी रावण दहन कार्यक्रम पार पडला असला तरी देशात अनेक ठिकाणी रावण दहन न होता रावण पूजन करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्राच्या अकोला जिल्यातील सांगोला या छोट्याश्या खेड्यात सुद्धा दसऱ्याला रावणाची अतिशय भक्तीभावाने पूजा केली जाते आणि गेली २०० वर्षे ही परंपरा सुरु आहे.

या गावात काळ्या पत्थरातून घडविलेली भव्य रावण मूर्ती असून तिला दहा तोंडे आणि वीस हात आहेत. स्थानिक सांगतात, येथे रावण पुजला जातो तो त्याच्या बौद्धिक क्षमता आणि गुणाची कदर करून. रावण विद्वान होता आणि चांगला राजा होता. त्याने सीताहरण केले ते राजकीय हेतूने. रावणाने सीतेचा शिलभंग कधीच केला नव्हता. गावात श्रीराम पूजनीय आहेतच पण आमची रावणावर सुद्धा श्रद्धा आहे. त्यामुळे येथे त्याचा पुतळा जाळला जात नही.

गावात सुखसमृद्धी आणि शांतता आहे त्याला येथील रावण प्रतिमाच कारणीभूत आहे असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. दसऱ्यादिवशी येथे दूरदूरच्या गावातून अनेक लोक रावण दर्शन करण्यासाठी येतात असेही सांगितले जाते.

Leave a Comment