नोकरीचा शरीराच्या आकारावर परिणाम

research
ऑस्ट्रेलियातल्या काही शास्त्रज्ञांनी आपण करत असलेली नोकरी, त्या नोकरीत आपण वापरत असलेले कौशल्य आणि आपल्या शरीराचा आकार यांचा घनिष्ठ संबंध असतो असे दाखवून दिले आहे. आजवर असे मानले जात होते की बैठी कामे करणार्‍या लोकांचे वजन वाढते. त्यांच्या वाढत्या वजनाचा संबंध बसून कामे करण्याशी आणि शरीरिक हालचाली न होण्याशी जोडला जात होता. परंतु या शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे की, ज्यांना बसल्या जागेवरून निर्णय घ्यावे लागतात त्यांच्या मेंदूला ज्या प्रकारचा व्यायाम होतो त्या मेंदूच्या व्यायामामुळे पोटाचा आकार वाढू शकतो.

याचा अर्थ असा की कंबरेचा आकार वाढणे किंवा लोअर बॉडी मास इंडेक्स वाढणे याचा मेंदूला पडणार्‍या ताणाशी थेट संबंध आहे. काही लोक बैठी कामे करतात परंतु त्यांच्या बैठ्या कामाचे स्वरूप निव्वळ काम करणे एवढेच असते आणि त्यांच्याही शरीराचा आकार वाढत असतो. परंतु बैठ्या कामांपैकी निर्णय घेण्याचे काम ज्यांना करावे लागते त्यांच्या शरीराचा आकार वेगळ्या पध्दतीने वाढतो. त्यांची फक्त कंबर मोठी होत जाते. एकंदरीत बैठे काम वजन वाढवते पण त्यातल्या त्यात निर्णय घेण्याचे बैठे काम शरीराचा आकार वेगळ्या पध्दतीने वाढवते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment