तणावमुक्तीचे बहुतेक ‘अॅप्स’ निरुपयोगी

app
लंडन: तणावमुक्तीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन ‘अॅप्स’पैकी ८५ टक्के ‘अॅप्स’ निरुपयोगी ठरत असल्याची टीका इंग्लंडमधील मानसोपचारतज्ज्ञांनी केली आहे. अशा ‘अॅप्स’ना राष्ट्रीय आरोग्य सेवेने दिलेली मान्यता काढून घेण्यात यावी; अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सध्याच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात मानसिक ताणतणाव मोठया प्रमाणावर वाढत आहेत. मात्र एवढ्या मोठया प्रमाणात प्रत्यक्ष उपचार उपलब्ध करून देण्यास आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे स्मार्ट फोनवर उपलब्ध असलेले ‘अॅप्स’ आणि ‘इंटरअॅक्टिव्ह ऑनलाईन’ सुविधा यांना मोठी लोकप्रियता लाभत आहे. त्यातच राष्ट्रीय आरोग्य सेवेने या ‘अॅप्स’ना मान्यता दिल्याने लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासही निर्माण झाला.

मात्र ही ‘अॅप्स’ मानसोपचार करण्यात पुरेशा प्रमाणात प्रभावी ठरत नसल्याचे निरिक्षण या क्षेत्रातील तज्ञांनी नोंदविले आहे. या ‘अॅप्स’ची वैद्यकीय उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी त्याच्या कठोर चाचण्या करण्यात याव्या आणि जोपर्यंत त्यांची उपयुक्तता आणि शास्त्रशुद्ध कार्यपद्धती सिद्ध होत नाही; तोपर्यंत राष्ट्रीय आरोग्य सेवेने त्याची मान्यता रद्द करावी; अशी मागणी लिव्हरपूल विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे सायमन लेह आणि लिव्हरपूल मानसोपचार विभागाचे स्टीव्ह फ्लॅट यांनी केली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment