जुळे नव्हे, डुप्लीकेटही नव्हे, आम्ही सख्खे भाऊ


मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही मालिकांवर आपल्या निखळ आणि सरस विनोदाने रसिकांची करमणूक करणारा, चला हवा येऊ द्या या सिरीयल मुळे देशाच्या मराठी भाषिक कुटुंबात घराघरात पोहोचलेला भाऊ कदम म्हणजे भालचंद्र कदम याने नुकताच एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकौंटवर शेअर केला आहे. आजकाल सेलेब्रिटीचे डुप्लीकेट सोशल मीडियावर सतत झळकत असतात. विराट, शाहरुख, अक्षय, कतरिना, अनुष्का शर्मा यांच्या डुप्लीकेटनी लोकप्रियता मिळविली आहे. त्याचा धर्तीवर सध्या भाऊचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या फोटोत हुबेहूब भाऊ सारखाच दिसणारा एक माणूस आहे. तो भाऊचा जुळा असावा किंवा डुप्लीकेट असावा असे कुणालाही वाटेल. पण हा माणूस म्हणजे आपल्या भाऊचा सख्खा मोठा भाऊ आहे. भाऊने आपल्या मोठ्या भावाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हा फोटो शेअर केला आहे. त्यात दोघा भावातील साम्य अगदी चकित करणारे आहे.

भाऊ कदमला सतत शुटींग मुळे कुटुंबांसमवेत जास्त वेळ घालविता येत नाही. भाऊ आणि पत्नी ममता यांना तीन मुली आहेत. पण जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा भाऊ तो कुटुंबासमवेत घालविण्यास प्राधान्य देतो कारण तो खरा कुटुंबवत्सल आहे.

Leave a Comment