चालण्याने आयुष्य सात वर्षांनी वाढते : ब्रिटिश संशोधक

walk
लंडन : ब्रिटिश संशोधकांनी चालण्याने केवळ आरोग्यच सुधारत नाही, तर आयुर्मानही वाढते, असा दावा केला असून तुम्ही दररोज २५ मिनिटे चाललात, तर तुमचे आयुष्य सात वर्षांनी वाढते, असे हे संशोधक सांगतात.

हृदयरोगाचे सध्या प्रमाण खूपच वाढलेले असून ५० ते ६० वयोमानातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू येण्याचे प्रमाणही वाढले आहे. आधुनिक व्यायाम पद्धतीमुळे तर हृदयविकाराचा धोका आणखी वाढला आहे. ब्रिटनमध्ये तर हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, प्रत्येक सात सेकंदात या देशात एकाचा मृत्यू हृदयविकाराने होत असल्याचे चित्र आहे. या सर्वावर एकच उपाय आहे, तो म्हणजे चालणे, असे या संशोधकांनी सांगितले.
ब्रिटनमध्ये व्यायामाच्या अभावामुळे अनेक तरुणांमध्ये स्थूलपणा आणि मधुमेहाचे प्रमाणही वाढले आहे, याकडेही या संशोधकांनी लक्ष वेधले.

‘यूरोपीयन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी’ मध्ये (ईएसजी) या संशोधकांनी आपला संशोधनपर अहवाल सादर केला. या संशोधकांनी ३० ते ६० वयोगटांतील ६९ व्यक्तींची तपासणी केली. या व्यक्ती कोणत्याही आजाराने बाधित नव्हत्या आणि त्या धूम्रपानही करत नव्हत्या. पण त्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव होता. त्यांना दररोज चालण्याचा व्यायाम करण्यास सांगण्यात आले.

सहा महिन्यांनंतर त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या काही शारीरिक बदल झाल्याचे दिसून आले. त्यांची रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारल्याची दिसून आली. हृदयाचा रक्तपुरवठाही सुधारला, त्यामुळे त्यांचा हृदयविकाराचा धोका टळल्याचे दिसून आले. त्याशिवाय दररोज चालण्याने भूक लागत असल्याचे आणि मानसिक समाधान मिळत असल्याचेही दिसून आले, अशी माहिती या संशोधकांनी दिली.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment