दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमिवर लोटला भीमसागर


नागपूर – शहरातील दीक्षाभूमी परिसरात बौद्ध अनुयायांनी 63व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गर्दी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला लाखो अनुयायांसोबत नागपूरमध्ये हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. विजया दशमीला ही घटना घडल्याने दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमीवर आंबेडकर अनुयायी भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमतात.

तसेच काही लोक यादिवशी स्वतःच्या धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. आजच्या या सोहळ्याला जपानचे भंते नोबुहीरो कुबोडेरा, शीनचीरो किशी, सिईगो ससहारा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. महत्वाचे म्हणजे या दिवशी दिक्षाभूमीवर अनेक राजकीय पक्षातील नेते आवर्जून उपस्थित राहतात. परंतु, यावर्षी आचारसंहिता लागू असल्यामुळे राजकीय नेत्यांची कमतरता जाणवणार आहे.

Leave a Comment