803 किलोंच्या भोपळ्यामुळे दांपत्यांने जिंकले लाखो रूपये

कॅनेडाच्या ब्रुस काउंटी येथील पोर्ट एल्गिन गावात काही दिवसांपुर्वी 33 वा वार्षिक पम्पकिन (भोपळा) फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कॅमेरॉनच्या जेन आणि फिल हंट या दांपत्याने जवळपास 803.54 किलो वजनाचा भोपळा आणला होता. या दांपत्याने फेस्टमधील सर्वात मोठा भोपळा आणत 3 हजार कॅनेडियन डॉलरचा (1.60 लाख रूपये) पुरस्कार देखील जिंकला.

(Source)

जेन हंट यांनी सांगितले की,  हे बक्षीस संपुर्ण टीममुळे मिळाले आहे. मी सर्व बियाणे व्यवस्थित लावली. झाडांच्या आजूबाजूला असलेली सर्व विषारी झाडे काढून टाकली. त्यांची काळजी घेतली, त्यांना खत टाकले. त्याचा परिणाम आज आपल्यासमोर आहे.

हे दांपत्य 1990 पासून मोठमोठ्या भाज्या उगवून स्पर्धा जिंकू पाहत होते. अखेर त्यांनी ही स्पर्धा जिंकत रेकॉर्ड बनवला.

 

Leave a Comment