सोनीने लाँच केला हा शानदार स्मार्टफोन

सोनी कंपनीचे स्मार्टफोन सध्या बाजारातून गायब झालेल्या दिसत आहेत. मात्र कंपनीने आता एक दमदार स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कंपनीने एक्सपेरिया 8 हा स्मार्टफोन लाँच केला असून, यात स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर देण्यात आला आहे. सध्या हा फोन केवळ जापानमध्ये लाँच करण्यात आला आहे.

(Source)

या फोनमध्ये 6 इंचचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. ज्याचा आस्पेक्ट रेशिओ 21:9 आहे. याचबरोबर फोनच्या मागे व पुढे गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शन आहे. हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजमध्ये मिळेल. फोनची बॉडी मेटलची आहे.

(Source)

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय ड्युल रिअर कॅमेरा देण्यात आला असून, एक कॅमेरा 12 मेगापिक्सल असून दुसरा 8 मेगापिक्सल आहे. फोनममध्ये 2760mAh ची बॅटरी आहे. फोनची किंमत 54,000 येन म्हणजे जवळपास 35,900 रूपये आहे.

Leave a Comment