सॅल्फर्ड विद्यापीठाची आशा भोसले यांना डॉक्टरेट पदवी


आणखी एक मानाचा तुरा सिनेसृष्टीवर आपल्या आवाजाने अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांच्या शिरपेचात रोवला गेला आहे. विविध पुरस्कारांनी आजवर त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. इंग्लंडच्या सॅल्फर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी देखील आता त्यांना मिळाली आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन याबाबतची माहिती आशाताईंनी दिली आहे.

त्यांनी त्यांचे फोटो ‘सॅल्फर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी स्वीकारताना’, असं कॅप्शन देऊन शेअर केले आहेत. संगीत क्षेत्रात आशाताई या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आजही त्यांची बरीच गाणी लोकप्रिय आहेत. यामध्ये ‘पर्दे मे रेहने दो’, ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’ यांसारखी विविध गाणी सुपरहिट ठरली होती. २००० साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि २००८ साली पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Comment