2 हजाराच्या नोटेबाबत होणाऱ्या अफवेवर आरबीआयने दिले ‘असे’ स्पष्टीकरण


दोन हजाराची नोट कायमची बंद होणार असल्याचे वृत्त मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सध्या बाजारात असणाऱ्या सर्व दोन हजाराच्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा घेत असून त्यासोबतच नवीन एक हजाराच्या नोटा बाजारात येणार असल्याचे देखील सांगण्यात होते. पण आरबीआयतर्फे या सर्व चर्चांवर नुकतेच स्पष्टीकरण देण्यात आले. या सर्व अफवा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवून गोंधळून जाऊ नये, असे आरबीआयने आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर मध्यंतरी काही ट्विट्स वारंवार दोन हजाराच्या नोटेच्या बंदीवर भाष्य करत होते. काही जणांकडून आकाराने दोन हजाराची नोट ही मोठी असल्याने एटीएम मधून सहज बाहेर येत नसल्याची तक्रार येत होती, परिणामी आरबीआय व सर्व सहकारी बकनाच्या एटीएम मधून २००० ची नोट हटवून त्याजागी 100,200,500 च्या नोटा समाविष्ट करण्यात येणार असल्याचे म्हंटले जात होते. इतकेच नव्हे तर आरबीआयतर्फे येत्या काळात पैशाच्या व्यवहारावर निर्बंध लावून आपण दहा दिवसात केवळ 50 हजार इतकीच रक्कम ट्रान्स्फर करू शकता असे मॅसेज सुद्धा व्हायरल होत होते.

Leave a Comment