पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर आला राखीचा नवरा


नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारी बॉलीवूडची ड्रामा क्वीन अर्थात राखी सावंतने गुपचूप लग्न केल्याची काही दिवसांपासून चर्चा होती. सोशल मीडियात तिचे ब्राइडल लूकमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना उधाण आले होते. त्याचबरोबर राखीने गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा जोर पकडत होती. पण कोणालाही या ड्रामा क्विनच्या लग्नावर विश्वास नव्हता. पण आका आता राखीने खरोखर लग्न केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रिेतेश नावाच्या एनआरआयशी लग्न केले असल्याचे राखीने सांगितले होते. पण अद्याप कोणीही त्याचा चेहरा पाहिलेला नाही. नुकताच ‘स्पॉटबॉ-ई’ या बेवसाईटला मुलाखत देत लग्नाच्या चर्चांवर रितेशने शिक्का मोर्तब केले आहे. राखीशी केलेल्या लग्नाच्या विषयावर रितेशने दिलेल्या मुलाखतीमध्ये चर्चा केली आहे. कॅमेरा समोरचे राखीचे वागणे कसे ही असो मला ती मनापासून आवडते. ती एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे. राखी सारखी पत्नी मिळाल्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो. देवाने राखी ही माझ्यासाठी दिलेली एक भेट आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी तिच्यासारखी महिला पाहिली नसल्याचे रितेशने सांगितले आहे.

दरम्यान मीडियापासून दूर राहण्याबाबत काही प्रश्न रितेशला विचारण्यात आले होते. रितेशने त्यावर तो एवढे दिवस मीडियापासून दूर का राहिला याचे स्पष्टीकरण दिले आहे. मीडियासमोर मी का यावे? त्यातून काय साध्य होणार आहे का? उगाच नको त्या चर्चा सुरु होतील. मला माझे खाजगी आयुष्य मीडियासमोर मांडायला आवडत नाही. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात त्याने मला काडीमात्र फरक पडत नाही. माझे कुटुंबीय आणि राखीचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. मी योग्य वेळ पाहून मीडियासमोर येईन. सध्या तरी माझा सर्वांसमोर येण्याचा विचार नसल्याचे रितेश म्हणाला आहे.

राखीच्या बोल्ड सीन्सबद्दलही रितेशला विचारण्यात होते. राखीने नुकतेच माझ्याशी लग्न करत एका नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. चित्रपटांमध्ये पत्नीने बोल्ड सीन द्यावेत असे कोणत्या पतीला वाटेल. पण तिच्या कपड्यांवर माझा काही आक्षेप नाही. तिला तिच्या आवडीचे कपडे घालण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे रितेश पुढे म्हणाला.

Leave a Comment