पबजी खेळताना ही चूक केल्यास व्हाल 10 वर्षांसाठी बॅन

पबजी हा सध्या जगभरात सर्वाधिक खेळला जाणारा गेम आहे. जगभरात करोडो युजर्स हा गेम खेळत आहेत. याचबरोबर प्लेयर्स या गेममध्ये चिकन डिनर जिंकण्यासाठी चिटिंग आणि हॅकिंग देखील करत आहेत. मात्र आता पबजी मेकर्सनी ही चिटिंग आणि हॅकिंग रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.

गेमच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पबजी आता 10 वर्षांचा बॅन आणणार आहे. पबजीने म्हटले आहे की, थर्ड पार्टी अॅप आणि हॅक करणाऱ्या प्लेयर्सवर 10 वर्षांचा बॅन लावणार आहोत. हॅकर्स चिटिंग करून चिकन डिनर मिळवतात. तसेच, प्रिमियम सेवा देखील वापरतात.

पबजीच्या प्लेयर्सला गेममध्ये रिपोर्टिंग प्रोसेसची सुविधा मिळेल. याद्वारे चिटिंग करणाऱ्या प्लेयर्सच्या विरोधात  तक्रार करता येईल. याचबरोबर चिटिंग करणाऱ्या प्लेयर्सचे नाव प्लॅटफॉर्मवर शेअर केले जातील. पबजीने सप्टेंबरमध्ये 3500 प्लेयर्सवर बॅन लावला होता.

 

Leave a Comment