नोबेल पुरस्काराविषयी जाणून घ्या संपुर्ण माहिती

नोबेल पुरस्कार हा दरवर्षी अद्वितीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना दिला जातो. हा पुरस्कार शांती, साहित्य, भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, मेडिसिन आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये दिले जाते. नोबेल पुरस्काराची स्थापना रसायनशास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यू पत्रानुसार 1885 मध्ये झाली. अल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्यूपत्रात लिहिले होते की, त्यांचा सर्व संपत्ती ही नोबेल फाउंडेशनला देऊन टाकण्यात यावी. नोबेल पुरस्काराचे प्रशासकीय कार्य हे नोबेल फाउंडेशन बघते. नोबेल फाउंडेशनची स्थापना 1900 मध्ये झाली. प्रत्येक नोबेल पुरस्कार हा वेगळ्या समितीकडून दिला जातो. रॉयल स्विडिश अॅकेडमी सायन्सेज भौतिकशास्त्र, केमिस्ट्री आणि अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची निवड करते. तर कॅरोलिन इंस्टिट्यूट, स्कॉटहोम, स्वीडन मेडिसिन क्षेत्रातील विजेत्यांच्या नावाची घोषणा करते. साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार स्वीडिश अॅकेडमी आणि शांततेच्या पुरस्काराच्या विजेत्याची निवड नॉर्वेच्या संसदेद्वारे केली जाते.

1901 मध्ये पहिल्यांदा देण्यात आला नोबेल पुरस्कार –

1990 मध्ये सर्वात प्रथम भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, मेडिसिन, साहित्य आणि शांततेचा क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला. पहिला नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्रात विलहम कॉनरॅड रॉटजन, केमिस्ट्रीच्या क्षेत्रात जॅकोबस हेनरीकस वांट हॉफ, मेडिसिनमध्ये इमिल वॉन बेहरिंग, साहित्यच्या क्षेत्रात सुली प्रुधोम आणि शांततेसाठी हेनरी डूनांट यांना देण्यात आला होता.

(Source)

कोण होते अल्फ्रेड नोबेल –

अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म 21 ऑक्टोंबर 1833 मध्ये स्वीडनमध्ये झाला होता. अल्फ्रेड हे रसायनशास्त्रज्ञ आणि इंजिनिअर होते. त्यांनी डाइनामाइट नावाच्या स्पोटकांचा शोध लावला होता. 10 डिसेंबर 1896 मध्ये इटलीच्या सौन रेमो येथे त्यांचे निधन झाले. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्या डाइनामाइट या शोधामुळे त्यांना मोठा पश्चाताप होत असे. त्यामुळे त्यांनी आपल्या संपत्तीचा वापर करून नोबेल फाउंडेशनची स्थापना केली.

आतापर्यंत 52 महिलांना नोबेल पुरस्कार –

1901 पासून ते 2018 पर्यंत 52 महिलांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. केवळ मेरी क्यूरी या महिलेला दोनदा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. 1903 मध्ये भौतिकशास्त्र आणि 1911 मध्ये केमिस्ट्रीसाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे.

(Source)

सर्वात कमी वयाची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई –

मलाला युसुफजाईला सर्वात कमी वयात नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तिला 17 व्या वर्षी 2014 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पाकिस्तानमध्ये राहणारी मलाला युसुफजाई एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मलाला पाकिस्तानमध्ये महिलेंच्या शिक्षणासाठी लढताना तालिबान्यांनी गोळ्या घातल्या होत्या.

या भारतीयांना मिळाला आहे नोबेल पुरस्कार –

रवीन्द्रनाथ टैगौर

चंद्रशेखर वेंकटरमन

मदर टेरेसा

अमर्त्य सेन

कैलाश सत्यार्थी

मूळ भारतीय वंशाचे –      

हरगोविंद खुराना

सुब्रह्मण्यन् चंद्रशेखर

वेंकटरमन रामकृष्णन

वीएस नायपॉल

Leave a Comment