रणवीरने माझा चष्मा का घातला आहे ?, धोनीच्या लेकीचा प्रश्न

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह नेहमची आपल्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असतो. रणवीर काही दिवसांपुर्वी एले ब्युटी अवॉर्डसमध्ये उपस्थित होता. यावेळी त्याने काळा कोट, काळी टोपी आणि स्टाइलिश चष्मा घातला होता. त्याचा हा फोटो सध्या एका वेगळ्याच कारणासाठी व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने आपली मुलगी झीवाचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये झीवाने रणवीर सिंह सारखाचा चष्मा घातला होता. धोनीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये या फोटोबद्दल जी माहिती दिली, ती वाचून तुम्ही देखील हसाल.

धोनीने लिहिले की, झीवाने जेव्हा हा (रणवीर सिंहचा) फोटो बघितला, तेव्हा ती म्हणाली, त्यांनी माझा चष्मा का घातला आहे ? ती वरती गेली आणि स्वतःचा चष्मा शोधू लागली. तेव्हा ती म्हणाली, माझा चष्मा हा केवळ माझाच आहे. लहान मुल सध्या बदलली आहेत. मी तर नोटिस देखील केले नव्हते की, त्यांच्याकडे एकसारखा चष्मा आहे. पुढच्या वेळेस रणवीरला भेटल्यावर ती नक्की म्हणेल की, माझ्याकडे देखील तुमच्या सारखाच चष्मा आहे.

धोनीने शेअर केलेला रणवीर आणि झीवाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर कमेंट करत रणवीर देखील झीवाला कूल असल्याचे म्हटले.

Leave a Comment