इंस्टाग्रामचे हे फिचर खरेदीपूर्वीच देणार ट्राय करण्याची संधी

फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्राम आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित नवीन शॉपिंग फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सला एखादे प्रोडक्ट खरेदी करण्यापुर्वी ट्राय करता येणार आहे. या फिचरचा उपयोग केवळ इंस्टाग्रामवरून शॉपिंग करतानाच होणार आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स बघू शकतील की, एखादे प्रोडक्ट त्यांच्यावर चांगले दिसत आहे की नाही.

फेसबुकने हे फिचर आपल्या मार्केटप्लेस सेक्शनमधील काही ठराविक ब्रांड्ससाठी आधीच लाँच केलेले आहे. इंस्टाग्रामच्या या फिचरचा वापर करून युजर्स आपला एक्सपेरियंस इंस्टाग्राम स्टोरिजमध्ये देखील शेअर करू शकतील. वैशिष्ट्य म्हणजे या स्टोरीज् बरोबर त्या प्रोडक्टची लिंक देखील असेल.

याशिवाय काही दिवसांपुर्वीच इंस्टाग्रामने थ्रेड नावाचे मेसेज अॅप लाँच केले आहे. याद्वारे इंस्टाग्राम युजर्स आपल्या क्लोज फ्रेंडला लाईव्ह लोकेशन, गाडीचा स्पीड, बॅटरी लाईफ शेअर करू शकतील. इंस्ट्रागामचे हे अॅप स्नॅपचॅटला टक्कर देईल.

Leave a Comment