या 11 विजयांमध्ये भारतीय वादुदलाने केला आहे मोठा पराक्रम

आजपासून 87 वर्षांपुर्वी देशातील पहिल्या हवाई दलाच्या टीमची स्थापना झाली होती.  8 ऑक्टोंबर 1932 ला भारतीय वायुदलाची स्थापना करण्यात आली होती. सुरूवातीला यात 4 वेस्टलँड बायप्लेन्स आणि 5 भारतीय पायलट होते. आज भारतीय वायुदलाच्या ताफ्यात 1720 पेक्षा अधिक विमान आणि 1.70 लाखांपेक्षा अधिक वायुसैनिक आहेत. आज भारतीय वायुदलाच्या वर्धापनदिनानिमित्ताने आम्ही तुम्हाला 11 असे पराक्रम सांगणार आहोत, ज्यात भारताला विजय मिळून देण्यात वायूदलाची महत्त्वाची भूमिका होती.

(Source)

द्वितीय विश्व युध्द –

द्वितीय विश्व युध्दात जापानच्या सैन्य बर्माच्या दिशेने पुढे सरकरत होते, त्यावेळी भारतीय वायुदलाने त्यांना रोखले. भारतीय वायुदलाने थायलंडमधील अराकान, माए होंग सोन, चियांग माय आणि चियांग राई या ठिकाणावरील जापानी सैन्याच्या बेस कॅम्पवर हल्ला करत त्यांना मागे धाडले. या युध्दात भारतीय वायुदल हे ब्रिटिश आणि अमेरिकेच्या सैन्याची मदत करत होते. या युध्दाचे हिरो फ्लाइट लेफ्टिनेट अर्जुन सिंह होते. ते नंतर एअरफोर्सचे मार्शल देखील झाले.

(Source)

1947 – भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा…

देशाच्या स्वातंत्र्यबरोबरच भारत आणि पाकिस्तानचे विभाजन झाले. वायुदलाची देखील दोन भागात विभागणी करण्यात आली. त्याचवेळी जम्मू-काश्मीरवर कबीलाई हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्लेखोरांना पाकिस्तानचे समर्थन होते. दोन्ही देशांमध्ये अघोषित युध्द सुरू होते. जेव्हा काश्मीरचे लोक या परिस्थितीमध्ये अडकले तेव्हा भारतीय वायुदलाने त्यांना बाहेर काढण्यास मदत केली.

(Source)

1960-61 – काँगो आणि गोवा –

1960 मध्ये काँगोमधील बेल्झियमचे शासन संपले. त्यानंतर पुर्ण काँगोमध्ये हिंसा आणि उद्रेक सुरू झाला होता. हा हिंसाचार रोखण्यासाठी भारतीय वायुदलाने 5 स्क्वाड्रन काँगोला पाठवले होते. त्यानंतर 1961 मध्ये पोर्तुगीज शासन गोवा सोडण्यास तयार नव्हते. तेव्हा भारतीय वायुदलाने ऑपरेशन विजय अंतर्गत पोर्तुगीज सैन्याचा पराभव करत गोव्याचा भारतात समावेश केला.’

(Source)

1965 चे पाकिस्तानबरोबरील युध्द –

1947 नंतर दुसऱ्यांदा पाकिस्तानने काश्मिर ताब्यात घेण्यासाठी हल्ला केला. मात्र यावेळीही त्यांना पराभव स्विकारावा लागला. भारतीय वायुदलाने पाकिस्तानचे अनेक लढाऊ विमान पाडले, त्यांचे बेस कॅम्प उद्धवस्त केले. भारतीय वायुदलाचे देखील मोठे नुकसान झाले होते, मात्र अखेर भारताला विजय मिळवून देण्यात वायुदलाने महत्त्वाची भूमिका पार पाडली.

(Source)

1971  – बांग्लादेशची निर्मिती

बांग्लादेशला पाकिस्तानपासून वेगळे करण्यामध्ये भारतीय वायुदलाची महत्त्वाची भूमिका होती. भारतीय वायुदलाने बांग्लादेशच्या वरून 12 हजारांपेक्षा अधिक वेळा उड्डाण घेतले. वायुदलाने या युध्दात पाकिस्तानच्या 94 विमानांना पाडले होते.

(Source)

1984 ऑपरेशन मेघदूत

भारतीय वायूदलाच्या मदतीने भारतीय सैन्याने 13 एप्रिल 1984 मध्ये ऑपरेशन मेघदूत अंतर्गत शियाचीनवर हल्ला केला. त्यानंतर संपुर्ण शियाचीन ग्लेशिअरच भारताच्या ताब्यात   आले.

(Source)

1987 श्रीलंका सिविल वॉर –

श्रीलंकेतील तामिळ विद्रोह्यांमुळे गृह युध्द सुरू झाले होते. श्रीलका सरकारने भारत सरकारकडे मदत मागितली. यानंतर भारतीय वायुदलाने ऑपरेशन पूमलाई सुरू केले. त्यानंतर ऑपरेशन पवन अंतर्गत श्रीलंकेच्या एक लाख सुरक्षादलातील सैन्यांना बाहेर काढण्यात आले. यासाठी वायुदलातील विमानांनी 70 हजार उड्डाणे घेतली होती.

(Source)

1988 – मालदीव –

3 नोव्हेंबर 1988 ला वायुदलाने मालदीवची राजधानी माले येथे चार मिराज लढाऊ विमान आणि आयएल-76 उतरवले. काही सशस्त्र गुन्हेगारांनी माले येथे कब्जा केला होता व यासाठी राष्ट्रपती गयूम यांनी मदत मागितली होती. या मिशनचे नाव ऑपरेशन कॅक्ट्स होते.

(Source)

1999 – कारगिल युध्द –

कारगिल युध्दात वायुदलाने हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानांच्या मदतीने कारगिलच्या टोकावर हल्ला करण्यास सुरूवात केली. मात्र यात दोन फायटर जेट आणि एक हेलिकॉप्ट मिसाईल उद्धवस्त झाले. त्यानंतर वायुदलाने रणनीती बदलत मिराज आणि मिग 29 ने पाकिस्तानवर हल्ला केला. अखेर 26 जुलैला भारताचा विजय झाला.

(Source)

2019 – बालाकोट

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने 14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामा येथे मोठा हल्ला केला. यामध्ये सीआरपीएफचे 46 जवान शहीद झाले. त्यानंतर 15 दिवसांच्या आतच वायुदलाने पीओकेमधून घुसून 12 मिराज फायटर प्लेनच्या मदतीने बालाकोट, चकोठी, मुज्जफराबाद येथील दहशतवादी तळे उद्धवस्त केली.

(Source)

अभिनंदन यांनी मिग 21 ने पाकचे एफ – 16 पाडले –

27 फेब्रुवारी 2019 ला भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या एफ-16 आणि जेएफ-17 या लढाऊ विमानांना भारतीय सीमेवर उड्डाण घेताना पाहिले. त्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 ने पाकचे एफ-16 हे विमान पाडले.

 

Leave a Comment